image
image
कृषी उद्योजकतेला नवी दिशा

कौशल्य वाढवण्यासाठीचे वैशिष्ट्यपूर्ण कोर्सेस

EXPLORE COURSES

FarmSchool का निवडावे?

01

100% प्रॅक्टिकल प्रशिक्षण

प्रत्यक्ष युनिट/प्रकल्प असलेल्या ठिकाणी संपूर्णपणे प्रॅक्टिकल ट्रेनिंग. व्यवसायाची संपूर्ण प्रक्रिया अनुभवण्याची जाणून घेण्याची संधी

02

मार्गदर्शनासाठी अनुभवी तज्ज्ञ

५ वर्षांपेक्षा जास्त प्रॅक्टिकल अनुभव असलेला शेतकरी/एक्स्पर्ट प्रशिक्षकाची निवड. ज्याने व्यवसायातील यश, अपयश, विक्री, मार्केटिंग, ब्रँडिंग या गोष्टी अनुभवल्या असतील.

03

व्यवसाय उभारणी आणि मार्केटिंग सपोर्ट

ट्रेनिंग घेतल्यानंतर पुढील १ ते २ वर्षांसाठी तुमच्या व्यवसाय उभारणीसाठी मोफत मार्गदर्शन. माल खरेदी, मार्केटिंग, ब्रँडिंग आणि विक्री व्यवस्था उभारण्यासाठी एक्स्पर्टकडून मदत

04

ऑनलाईन व ऑफलाइन कोर्सेस

ऑनलाईन कोर्ससाठी लाईफटाईम ॲक्सेस. ऑनलाईन कोर्स कुठेही, कधीही, कोणत्याही डिव्हाईसवर पाहता येतो. प्रत्यक्ष कोर्ससाठीच्या एकापेक्षा अधिक बॅच उपलब्ध

आमचे कोर्सेस 


ॲग्रीबिझनेस क्षेत्रातील  विशेष कोर्सेसमधून शिका आधुनिक शेतीतंत्रज्ञान, व्यवसाय उभारणी, उत्पादन, मार्केटिंग आणि ब्रँडिंगचे महत्त्वाचे पैलू.

लाकडी तेलघाणा व्यवसाय A टू Z प्रॅक्टिकल कोर्स
Rs.999

बाजारात मिळणाऱ्या प्रक्रियायुक्त तेलामुळे अनेक आजारांना बळी पडावे लागते. पारंपारिक लाकडी घाण्यावरील शुद्ध तेलामुळे आरोग्य अबाधित राहते. कोरोनानंतर आरोग्यदायी अन्नाला मागणी प्रचंड वाढली आहे. लाकडी घाण्याचे तेल हे मोठमोठ्या आजारांपासून दूर ठेवणारे अन्न आहे. लाकडी तेलघाणा व्यवसायाची सुरूवात, व्यवस्थापन अन् मार्केटिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी या कोर्समध्ये सखोलपणे शिकवल्या आहेत.

गांडूळ खत (एनरिचमेंट) + वर्मीवॉश A टू Z प्रॅक्टिकल कोर्स
Rs.999

रासायनिक खतांच्या अति वापरामुळे खराब झालेल्या जमिनी सुधारण्याची वेळ आता आलेली आहे. मातीचा सेंद्रीय कर्ब आणि सुपिकता वाढवण्यासाठी गांडूळ खत हा महत्त्वाचा पर्याय आहे. या व्यवसायाला सध्या प्रचंड प्रमाणात संधी आहेत. या कोर्सच्या माध्यमातून तुम्हाला गांडूळ खत तयार करण्याचे A टू Z प्रॅक्टिकल पाहायला मिळणार आहे. यासोबतच पिकनिहाय आणि मातीच्या गुणधर्मानुसार गांडूळ खतावर केली जाणारी एनरिचमेंट आणि वर्मिवॉशही शिकायला मिळणार आहे.

कृषी पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम
Rs.999

तुमच्या साध्या शेतीचे रूपांतर एका फायदेशीर कृषी पर्यटन केंद्रात करा! या कोर्समध्ये शिका—योग्य नियोजन, पर्यटकांसाठी आकर्षणे, राहण्या-खाण्याची व्यवस्था, शासकीय परवाने, आणि डिजिटल मार्केटिंगची ए टू झेड (A to Z) माहिती. शेतीला पर्यटनाची जोड द्या आणि दुप्पट उत्पन्न मिळवा!

Spirulina Farming
Rs.999

स्पिरुलिना शेती हा पोषक सूक्ष्म शैवालावर आधारित फायदेशीर व्यवसाय आहे. याचा वापर आरोग्य, अन्न आणि कॉस्मेटिक्स क्षेत्रात होतो. कमी गुंतवणुकीत उत्पादन, प्रक्रिया व मार्केटिंग करून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला नफा मिळवता येतो.

Solar Dehydration (सोलर ड्रायर)
Rs.2999

कमीत कमी खर्चात, कमीत कमी जागेत आणि कमी भांडवलात सुरू होणारा शेतीपूरक व्यवसाय शोधताय? काळजी करू नका. तुम्ही योग्य ठिकाणी आहात...! सोलर ड्रायरच्या मदतीने भाज्या, फळे व इतर शेतमाल सुकवून चांगल्या दरात विक्री करता येतात. फार्म स्कूल अॅग्रो सोल्यूशन (FSAS) आणि रहेजा सोलर (RSFP) यांच्या मदतीने तयार झालेल्या सोलर ड्रायर या ऑनलाईन कोर्समध्ये तुम्हाला या व्यवसायाचे प्रॅक्टिकल प्रशिक्षणासोबतच उत्पादन, व्यवस्थापन, मार्केटिंग, ब्रँडिंग या सर्व विषयाचे सखोल ज्ञान मिळणार आहे.

FarmSchool व्हिडिओ मधून प्रत्यक्ष शिकण्याचा अनुभव घ्या

या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवे प्रयोग, आणि तज्ज्ञांच्या टिप्स दाखवतो. पाहा, शिका आणि तुमच्या शेतीत नवा बदल घडवा.

image

मशरूमपासून गांडूळ खत! एकच सेटअप, 3 उत्पन्न! 💰 मशरूम + गांडूळ खत!

image

या शेवाळच्या शेतीतून महिन्याला ₹50,000 कमवू शकतो? शेवाळाची शेती, उत्पादन आणि व्यवसायाची माहिती!

image

घरच्या घरी मोत्याची शेती कशी करायची? 

आमचे ध्येय

आधुनिक शेतीतून सक्षम कृषी उद्योजक घडवणे

फार्म स्कूल हे शेतकऱ्यांसाठी नव्या शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन देणारे प्लॅटफॉर्म आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी शाश्वत उद्योजकता घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कृषी पर्यटन व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम
Spirulina Farming
Solar Dehydration (सोलर ड्रायर)
गांडूळ खत (एनरिचमेंट) + वर्मीवॉश A टू Z प्रॅक्टिकल कोर्स (Lifetime Access)
लाकडी तेलघाणा व्यवसाय A टू Z प्रॅक्टिकल कोर्स

FarmSchool बद्दल

image
About
फार्म स्कूल हे शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येत २०२४ मध्ये स्थापन केलेले नवे स्टार्टअप आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नव्या शेतीपूरक व्यवसायाची माहिती आणि प्रशिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमीत कमी किंमतीत शेतकऱ्यांना नवनव्या व्यवसायाची दारं उघडी व्हावीत आणि या माध्यामतून नवे उद्योजक घडवण्यासाठी आणि त्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी फार्म स्कूल काम करते. शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या ग्रामीण-शहरी तरूणांसाठी, नव उद्योजकांसाठी, स्टार्टअप करू इच्छिणाऱ्यांसाठी, महिलांसाठी आणि महिला शेतकऱ्यांना या स्टार्टअपचा नक्कीच फायदा होईल ही अपेक्षा.

आम्ही केवळ कृषी व्यवसायाचा एक शैक्षणिक प्लॅटफॉर्म नाही तर नवे व्यवसाय तयार करून त्यांना स्पर्धेच्या युगात शाश्वत अन् स्वयंपूर्ण करण्यासाठी काम करतो. दिवसेंदिवस शेतीपासून दुरावत चाललेल्या तरूणांना पुन्हा कृषी क्षेत्राकडे वळवण्याचा आणि शेतीला स्वयंपूर्णतेकडे नेण्यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न.

फार्म स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण महिला शेतकऱ्यांसाठी एक विशेष प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येणाऱ्या काळात विविध व्यवसायामध्ये इच्छुक असणाऱ्या महिला शेतकऱ्यांना फार्म स्कूल मोफत प्रशिक्षण आणि व्यवसाय स्वयंपूर्ण होईपर्यंत मार्गदर्शन दिले जाणार आहे. येणाऱ्या एका वर्षात १ हजार महिला शेतकरी उद्योजिका निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. यासोबतच मार्केट लिंकेज, इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि विक्री व्यवस्था उभारून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.

ग्रामीण महिला शेतकऱ्यांचे कृषी क्षेत्रातील योगदान पाहता या महिलांचे आरोग्य आणि महिला शेतकऱ्यांचे शिक्षण यावरही फार्म स्कूलकडून काम केले जाणार आहे.
12Courses
1000+Active Students